नात तीच नी माझं...
वेगळ होत नात
तिच्या सोबत जोडलेलं
मनात असुन नशिबात नसलेलं...
भेटवल नशिबाने
कायम आठवणीत राहण्यासाठी
नजरेच्या दूर पण
मनाने जवळं पाहण्यासाठी...
ह्या जन्मी नाही जमलं तुझं होणं
पण पुढच्या जन्मी नव्यानं भेटू
क्षितिजांच्या पार
एक नवी सुरवात करू...
नात तीच नी माझं अता वेगळ आहे
मी तिचा ती माझी
असं आयुष्य आम्ही ही थोड जगलं आहे...
- P.D.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा