अस ही काही नाही...
आहेस ना सुखात तू तशीच रहा
आहेस ना सुखात तू तशीच रहा
माझा विचार करावा तू अस ही काही नाही
इच्छा आहे तुला सर्व काही देण्याची
इच्छा आहे आहे तुला सर्व काही देण्याची
पण माझ्या कडूनच मिळाव अस ही काही नाही
येते रोज आठवण तुझी मी तरी काय करू
येते रोज आठवण तुझी मी तरी काय करू
पण तुला ही माझी आठवण यावी अस काही नाही
भेटाव वाटत रोज तुला, भेटाव वाटत रोज तुला
पण स्वप्नात रोज तूच याव अस ही काही नाही
लिहितो कविता तुझ्याचसाठी, लिहितो कविता तुझ्याचसाठी
पण प्रत्येक कविता सत्यात उतरावी अस ही काही नाही...
P.D
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा