सोबत
विचार करतो मी नेहमी
तु सोबत माझ्या चालू शकशील का
कधी कधी दुःख मिळेल कधी प्रेमाचा पाऊस पडेल
अशा दिवसात हसाव लागेल
अस नात निभावशील का
जेव्हा आपला भांडण होईल
तेव्हा नात्यात आपल्या गोडवा आणशील का
विचार करतो मी नेहमी
तु सोबत माझ्या चालू शकशील का
पैसा ही येईल नाव ही मिळेल
जेव्हा तू मिठीत घेशील आनंदाने मी हरवून जाईल
माझ्या स्वप्नांना वेळ देशील का
घरच्यांना समजावशील का
मी रात्री गझल लिहिल
तु कविता माझ्या वाचशील का
विचार करतो मी नेहमी
तु सोबत माझ्या चालू शकशील का
पुढचा प्रवास अवघड आसेल
आयुष्यात माझ्या एक नवीन पहाट तू आणशील का
प्रेमाने रंगलेल्या मेहंदी मध्ये
नाव माझ तू लिहीशील का
कवितेत तर नेहमी मी तुलाच शोधत असतो
आयुष्याचा सात जन्मांचा प्रवास
माझ्या सोबत करशील का
_प्रथमेश देशमुख.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा