न कळावे

 न कळावे क्षणांनाही

तु माझ्या सोबत असावे

आणि त्या क्षणी अचानक

पावसाने बरसावे...


न कळावे रात्रीलाही

तु माझ्या स्वप्नात यावे

बहरूनी चांदणी रात्रही

प्रेमाचे गीत गावे...


न कळावे कवितेलाही

तिच्यात मी तुला लिहावे

लिहिता लिहिता कविता मी तुझ्यावर

मग शब्दांनाही तु आठवावे

शब्दांनाही तु आठवावे....

_प्रथमेश देशमुख. 

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट