"चांदणी रात्र"

अलगद जशी चांदणी
रात्र ही सरते
आठवण तुझी मग
मनात दाटून येते
गुलाबी थंडीत भेट तुझी
हवी हवीशी वाटते
पाहूनी मग तुला
कविता मज उमजते
आपल्या आयुष्याचे जिवन गाणे
आपणच लिहायचे
पाहूनी मग स्वप्नं तुझे
रात्र माझी ही सरते.. 


रात्र माझी ही सरते..
_प्रथमेश देशमुख.


टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट