"प्रवास कॉलेजचा"

 कॉलेजच्या ह्या दुनियेत अनोळखी होत सगळ

हळूहळू सगळ्याशी ओळख झाली

सगळ्यानी आपलस केल

आणि हा प्रवास सुरू झाला

सगळे एकत्र हसायचे, रडायचे

कोणाला भानच नसायच कशाच

आणि कोणाला चाहुलच लागली नाही

कि एक दिवस हा प्रवास संपणार होता

रोज कॉलेजला येण, लेक्चर बंक करण

फिरायला जाण, teachers ला त्रास देण

शेवटच्या क्षणाला submissions करण

एकत्र मिळून सगळ्यांना उत्तर सांगून पेपर देण

कधी पास व्हायचो तर कधी ATKT लागायची 

असे हे अविस्मरणीय दिवस

 कधी विसरता येणार नाही 

परत कधी भेटू मित्रांनो माहीत नाही 

पण तुमची ही मैत्री तुमच हे प्रेम 

नेहमी आठवेल 

आज संपला आपला हा कॉलेजचा प्रवास इथे 

आणि आयुष्यात राहिल्या त्या फक्त आठवणी... 

_प्रथमेश देशमुख. 


टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट