"गाठ जन्मांची"

शब्दात नाही मांडता आल
तर डोळ्यांतून तु वाचशील ना...
हरवलो मी वाटेवर
तर शोधत मला तु येशील ना...
डोळ्यातून अश्रू माझ्या ओघळता
सावरून मला तू घेशील ना...
दुःख जर आले वाटेला
तर हात सुखाचा देशील ना...
दुरावा आला आपल्यात कधी
तरी नात आपल तु जपशील ना...
आयुष्यभराची गाठ
जरी बांधलीस कोणाशी
मनातला एक कोपरा तरी
मला देशील ना...
_प्रथमेश देशमुख. 

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट