"शोध सुखाचा"
चालत चाललोय वाटे वरून
पण वाट काही संपत नाही
शोध आहे तो सुखाचा
ह्या आयुष्याच्या वाटेवर
मज तो मिळत नाही...
वेडी वाकडी वळणे ही
ह्या वाटेवर,
पण मज थांबायचे नाही
आहे कोठेतरी दडलेले सुख माझे,
पण मज थांबायचे नाही...
जन्मास आलो मी
वाट तेव्हा पासून ही धरली
चालता चालता पोहोचलोय
अता मरणाच्या दारात
पण शोध सुखाचा हा
संपत नाही
शोध सुखाचा हा
संपत नाही...
_प्रथमेश देशमुख.
पण वाट काही संपत नाही
शोध आहे तो सुखाचा
ह्या आयुष्याच्या वाटेवर
मज तो मिळत नाही...
वेडी वाकडी वळणे ही
ह्या वाटेवर,
पण मज थांबायचे नाही
आहे कोठेतरी दडलेले सुख माझे,
पण मज थांबायचे नाही...
जन्मास आलो मी
वाट तेव्हा पासून ही धरली
चालता चालता पोहोचलोय
अता मरणाच्या दारात
पण शोध सुखाचा हा
संपत नाही
शोध सुखाचा हा
संपत नाही...
_प्रथमेश देशमुख.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा