"व्हॅलेंटाईन डे २०१९"

पाहताक्षणी तुला भान
रहात नाही मला या जगाचे
असता तु समोर माझ्या
पहात असतो एकटक तुझ्याकडे
वेड लावते मला
गोड हसू तुझ्या चेहर्‍यावरचे
तुझ्या डोळ्यांत दिसते मला
माझ्या बद्दल प्रेम तुझ्या मनातले
दूर जाता मी
नजर तुझी मलाच शोधत असते
ओठांवर तुझ्या नाव नेहमी
एका वेड्या कविचेच असते
काय करू वर्णन तुझे
तुझ्यासाठी शब्द ही अपुरे आहे
प्रेम कहाणी ही आपली
असेच राहूदे नेहमी
प्रेम तुझे माझ्यावरचे....
_प्रथमेश देशमुख.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट