"खूप दिवसांनी"

आज खूप दिवसांनी तुझी आठवण आली
आणि आपण एकत्र घालवलेल्या दिवसांची आठवण झाली
आज खूप दिवसांनी तुला भेटावस वाटलं
आणि तु मला सोडून गेलतीस तो दिवस आठवला
आज खूप दिवसांनी तुझ्याशी बोलावस वाटलं
आणि आपण तासनतास गप्पा मारत बसायचो ते आठवल
आज खूप दिवसांनी तुला बघावस वाटलं
आणि तु मला ओळखून न ओळखल्यासारखी करून
निघून जायचीस ते आठवल
आज खूप दिवसांनी तुझा हसरा चेहरा आठवला
आणि माझ्या चेहर्‍यावर हलकस हास्य आल
आज खूप दिवसांनी तुझ वेड वागण आठवल
आणि माझ वेड मन तुझ्या आठवणींमध्ये हरवल
आज खूप दिवसांनी पुन्हा तुझ्यावर प्रेम करावस वाटलं
आणि तु माझ ह्रदय तोडून निघून गेलतीस ते आठवल
आज खूप दिवसांनी वाटल तु पून्हा माझ ह्रदय तोडलस
आणि माझ्या मनावर झालेल्या जखमेवर पुन्हा मिठ चोळलस
आज खूप दिवसांनी.......
_प्रथमेश देशमुख. 

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट