तुझ्या माझ्या प्रेमाची रोज
कविता मी लिहितो
पाहता क्षणी तुला
तुझ्यात हरवून जातो.....
तुझ ते गोड बोलन
भावत माझ्या मनाला
तुझ्या बरोबर असताना
कसलच भान नसत
ह्या वेड्याला.....
तुझ ते गोड हसू पाहून
मन माझ घायल होत
आणि तु लाजलीस की
मन माझ वेड होत.......
तुझा तो एक स्पर्श मला
हवाहवासा वाटतो
जणू तुझा तो एक स्पर्श
मला तुझ्याकडे बोलवत असतो....
कळतच नाही कविता लिहीताना
हा वेडा तुझ्यात कसा हरवून जातो
कविता लिहीताना तुझाच चेहरा
माझ्या नजरे समोर असतो....
_प्रथमेश देशमुख. 

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट