"मैत्री काॅलेजची"

मित्र आहेत माझे काही खास
थोडे भोळे थोडे वेडे
पण मनाचे दिलदार
कधी भांडतात कधी चिडतात
पण थोड्या वेळाने लगेच एक होतात
अभ्यासाच आणि ह्यांच कधी जमतच नाही
उद्या लेक्चर्स करायचे अस बोलून
काॅलेजला तर येतात
एक लेक्चर बसतात आणि
 बाकीचे तीन बाहेरच काढतात
 ‎यारी आमची थोडी वेगळीच आहे
 ‎वेळ आली तर सगळे एकमेकांच्या पाठिशी असतात
 ‎मारामारी करन तर ह्यांना कधी जमलच नाही
 ‎पण तरी आम्ही आहोत तुझ्या बरोबर
 ‎तुला कोण काही करणार नाही अस नेहमी बोलतात
 ‎असे हे माझे मित्र
 ‎बिनधास्त आपल आयुष्य जगतात
 ‎चेहर्‍यावर नेहमी हसू आणतात
 ‎रोज कविता लिहीतो प्रेमावर
 ‎पण आज लिहिली यारी वर
 ‎कारण मित्रच आहेत माझी शान
 ‎आणि मित्रच आहेत माझी जान
 ‎म्हणूनच एक कविता माझ्या मित्रांसाठी खास...
 ‎_prathamesh deshmukh
 ‎

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट