"बाप"

"बाप"
जन्माला आलो तेव्हा माझ्या छोट्या बोटांना धरून
मला चालायला तू शिकवलस
जेव्हा काही बोलता येत नव्हत तेव्हा
सगळ्यात आधी बाबा बोलायला शिकलो
लहानाच मोठ करून
स्वतःच्या पायावर उभ राहायला शिकवलस
माझी प्रत्येक इच्छा पुर्ण व्हावी
म्हणून नाही नाही ते सोसलस
खूप कष्ट केलेस खूप घाम गाळलास
आणि मला मोठ केलस
माझी प्रत्येक इच्छा पुर्ण व्हावी
म्हणून स्वतःच जगणे ही विसरलास
रात्रि उशिरा घरी आलो तर मला खूप ओरडायचास
पण नंतर तुच मला प्रेमानी जवळ घ्यायचास
माझ्या चेहर्‍यावर नेहमी हसू असाव म्हणून
स्वतःच्या डोळ्यातील अश्रू तू लपवायचास
पण एकांतामध्ये खूप रडायचास
बाबा माझ्या पाठीशी तू नेहमी
साक्षात देव म्हणून उभा राहिलास
बाबा तुझ्या एवढा मोठा मी कधीच नाही होवू शकत
पण एक गोष्ट तुला सांगतो
माझ्या आयुष्यात तुझी जागा कोणीच नाही घेवू शकत....
_प्रथमेश देशमुख. 

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट