पावसाच्या सरी माझ्या
अंगावर अश्या बरसल्या
सोबत जुन्या आठवणी
घेवून आल्या
चिंब भिजलो त्या
पावसामध्ये आणि
हरवून गेलो त्या जुन्या
आठवणींनमध्ये
भिजताना भानच
 राहिले नव्हते ते ह्या जगाचे
 आणि तुझ्यात हरवून गेले
 वेडे मन माझे
 सोसाट्याचा वारा आला
 बेधुंद मला करून गेला
 आणि तु सोबत असल्याचा
 भास मला झाला
 मागे वळून पाहिले
 तर तो पावसाचा आवाज होता
 तेव्हा मला कळाले
 माझ्या आठवणींचा
 पावसानेच खेळ मांडला होता.....
 _प्रथमेश देशमुख. 

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट