एका वळणावर भेटलेली एक मुलगी
थोडी वेडी थोडी भोळी
पण माझी खुप काळजी घेणारी
आमच नात म्हणजे मैत्रीच्या थोड पलीकडे
आणि प्रेमाच्या थोड अलीकडे आस
तासनतास माझ्याशी गप्पा मारणारी
मला खूप छळणारी
आणि मला खूप त्रास देणारी
मी चिडलो की लाडानी मला मनवणारी
माझ्या सुखा:त आणि दु:खात
माझ्या बरोबर असणारी
चुकीच्या ठिकाणी मला
योग्य दिशा दाखवणारी
माझ्यावर खूप प्रेम करणारी
तिच माझी मैत्रीण तिच माझी प्रेयसी
आणि तिच माझ सगळ काही
अशी एक
चॉकलेट पेक्षा गोड
आणि अप्सरेपेक्षा सुन्दर
दिसणारी माझी मैत्रीण.....
_प्रथमेश देशमुख.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट