मैत्री...

आयुष्य म्हणजे समुद्र आहे
मैत्री म्हणजे किनारा आहे
निखळ वाहणाऱ्या ह्या समुद्राला
गरज असते ती एका किनार्‍याची
आणि तो किनारा म्हणजेच मैत्री
आणि हा म्हणजे असा आहे की
ह्याच्यासाठी ह्याच आयुष्य म्हणजे
मैत्रीच आहे...
मैत्रीसाठीच जगणारा आणि
मैत्रीसाठीच मरणारा
सगळ्या मित्रांवर जिवापाड प्रेम करणारा
वेळ आलीच तर मैत्रीसाठी
आपल्या जीवाची ही परवा न करणारा
ह्याच्यासाठी मैत्री हेच ह्याच विश्व आहे
आणि मैत्री हेच आयुष्य आहे...
_प्रथमेश देशमुख. 

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट