"अशीच होती ती"

"अशीच होती ती"

खूप सुंदर होती ती कोण होती काय माहिती
अनोळखी होती माझ्यासाठी पण तरी ओळखीची वाटतं होती मला ति,
स्वप्न बघायचो मी पण साकारायची ती
माझ्या अंधारातल्या आयुष्यात उजेड आणणारी होती ती,
स्वप्न होत माझ पण स्वप्नात होती ती
गुमसुम बसणारा होतो मी पण मला हसवणारी होती ती,
हरवलो मी तर मला शोधत यायची ती
मला काही झालं तर माझी काळजी घेणारी होती ती,
एकटा असलो मी तर मला साथ द्यायची ती
तु एकटा नाहीयेस मी तुझ्या सोबत आहे आस म्हणायची ती,
पाण्यासारखा वाहत जाणारा होतो मी मला सावरणारी होती ती
शरीर फक्त माझ होत पण माझी सावली होती ती,
अपुर्ण होतो मी मला पुर्ण करणारी होती ती
मी तर फक्त पुस्तक होतो पण माझी पुर्ण कहाणी होती ती,
कोण होती ती नाही माहिती
पण आशीच होती ती अशीच होती ती....
_ प्रथमेश देशमुख. 

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट