"न कळलेल प्रेम"

"न कळलेल प्रेम"

तुझ्याशी खुप बोलावस वाटं ग मला
पण बघ ना तुझ्याशी बोलण्याची इच्छा असतानाही बोलता येत नाही तुझ्याशी,
तुला भेटावस वाटतं ग मला
पण बघ ना भेटण्याची इच्छा असतानाही भेटताच येत नाही तुला,
तुला मिठीत घ्यावस वाटतं ग मला
पण बघ ना तू जवळ  नाहीस माझ्या,
तुला डोळे भरून पहावस वाटतं ग मला
पण बघ ना तू समोर नाहीस माझ्या,
तुझ्या बरोबर आयुष्य जगावस वाटतं ग मला
पण बघ ना तुझ प्रेम नशीबात नाही माझ्या,
तुझ्यावर खूप प्रेम करतो ग मी
पण बघ ना इतक प्रेम करुनही माझ प्रेम कधी कळालं नाही तुला.....
_ प्रथमेश देशमुख.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट