"तुझी आठवण"

"तुझी आठवण"
तू सोबत नाहीस म्हणून काय झालं
तुझ्या आठवणी तर माझ्या सोबत आहेत...
तू सोबत नाहीस म्हणून काय झालं
तुझा हसरा चेहरा तर माझ्या मनात आहे...
तू सोबत नाहीस म्हणून काय  झालं
तुझ्या बरोबर घालवलेले दिवस तर माझ्या सोबत आहेत...
तू सोबत नाहीस म्हणून काय झालं
तुझ्या बरोबर बघितलेल स्वप्न तर माझ्या सोबत आहे...
तू सोबत नाहीस म्हणून काय झालं
पण माझ्या मनात तर तू नेहमीच असतेस...
तू सोबत नाहीस म्हणून काय झालं
मी जाईल तिथे तू माझ्या बरोबरच तर असतेस...
तू सोबत नाहीस म्हणून काय झालं
माझ्या प्रत्येक कवितेत तर तुच असतेस...
तू सोबत नाहीस म्हणून काय झालं
येणाऱ्या पावसाच्या प्रत्येक सरीमध्ये तर मला तुच दिसतेस...
तू सोबत नाहीस म्हणून काय झालं
तू दिलेले अश्रू तर माझ्या डोळ्यात तसेच आहेत...
तू सोबत नाहीस म्हणून काय झालं
माझा प्राण तर तुच आहेस...
तू सोबत नाहीयेस म्हणून बाकी काही नाही
पण माझ जगण अता कठिण झाल...
तू सोबत नाहीस म्हणून.....
_प्रथमेश देशमुख. 

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट