"मला ही वाटायच"

"मला ही वाटायच "
मला ही वाटायच तुझ माझ्यावर प्रेम असाव
आणि तुझ्या प्रेमाच्या सहवासात मि वहावून जाव
मला ही वाटायच सतत तुझ्याकडे पहात रहाव
आणि तु निघून गेलीस की स्वप्नांनमध्ये तुला शोधाव
मला ही वाटायच तु मला मिठीत घ्यावस
आणि तु माझ्या मिठीत असताना मि तुला घट्ट पकडून ठेवाव
मला ही वाटायच तु मला आठवाव
आणि तुला माझी आठवण आली की मी तुझ्या स्वप्नांनमध्ये असाव
मला ही वाटायच तुझ्याशी खुप गप्पा मारत बसाव
आणि गप्पा मारता मारता हळूच तुला जवळ घ्याव
मला ही वाटायच आपण दोघांनीच एकत्र  कुठेतरी जाव
आणि दोघांनीच एकत्र आपल आयुष्य आनंदात जगाव
मला ही वाटायच तुझ्या बरोबर फिरत रहाव
आणि फिरता फिरता आपल आयुष्य असच निघून जाव
मला ही वाटायच तुझ्यावर खूप चिडाव
आणि नंतर प्रेमानी तुला मिठी मारून जवळ घ्याव
मला ही वाटायच तु कधीतरी माझ्यासाठी रडाव
आणि तु रडत असताना मी तुला सावराव
मला ही वाटायच माझ्या दु:खात तु माझ्या बरोबर असाव
आणि मी दु:खी असताना तु मला आपलस कराव
मला ही वाटायच तु माझ्यासाठी जगावस
आणि जगता जगता कायमची माझी होवून जावस
मला ही वाटायच तु मला कधीही न विसरावस
आणि आपण एकमेकान पासून दूर असतानाही तु मला तुझ्या मनात ठेवावस...
_प्रथमेश देशमुख.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट